best news portal development company in india

बार्शी तालुक्यामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या “पोलिस भरती महाडेमो” चे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.रणवीर भैय्या राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते.

SHARE:

बार्शी तालुक्यामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या “पोलिस भरती महाडेमो” चे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.रणवीर भैय्या राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते.सध्या बार्शी हे पोलिस भरतीचे केंद्रबिंदू बनले आहे. पोलिस भरती तयारीसाठी बार्शी मध्ये विविध ॲकडमी कार्यरत आहेत. बार्शी तालुक्याबरोबरच परांडा, भूम, माढा,करमाळा, इत्यादी तालुक्यातील प्रशिक्षणार्थी या ॲकडमी प्रशिक्षण घेतात.

आज विविध ॲकडमीनी पुढाकार घेऊन पोलिस भरती महाडेमो आयोजित केला होता. यामध्ये आशरफ सर, म्हेत्रे सर, शरद माने सर, श्री करिअर ॲकडमी चे उदयकुमार शिंदे सर, सुर्यपुत्र ॲकडमी चे भूषण तांबारे सर,क्रांती ॲकडमी चे कोकणे सर, पोलिस बांधव सूरज तांबारे साहेब, बोधले साहेब, पुंड साहेब, माने साहेब,वाघमोडे साहेब,पाटील साहेब यांनी पुढाकार घेऊन आयोजन केले होते.

या पोलिस भरती महाडेमो मध्ये जवळपास पोलिस भरती करणाऱ्या १००० उमेदवारांनी चाचणी दिली.

Mahasatta Times
Author: Mahasatta Times

Leave a Comment