best news portal development company in india

लक्ष्मी सोपान बाजार समिती येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सभापती यांचा सत्कार

SHARE:

लक्ष्मी सोपान बाजार समिती येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सभापती यांचा सत्कार
आज लक्ष्मी सोपान बाजार समिती येथे माढा च्या नगराध्यक्ष सौ. मिलनताई दादासाहेब साठे व उपनगराध्यक्ष सौ. कल्पनाताई जगदाळे यांच्या हस्ते, मा. आमदार श्री. राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली मिळालेल्या अभूतपूर्व निवडणूक यशाबद्दल बार्शीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. तेजस्विनीताई प्रशांत कथले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. विजय तुकाराम गरड (गरड सर) यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागाचा तसेच शेतकरी बांधवांचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींना शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी श्री. जयसिंग परदेशी, श्री. मंदार कुलकर्णी, तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahasatta Times
Author: Mahasatta Times

Leave a Comment