मोहोळ पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, गोवंशांची अवैधपणे तस्करी, वाहतूक करणाऱ्या आरोपीवर धडक कारवाई. ०७ आरोपींना अटक.
मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत गोवंशाची तस्करी व वाहतूक करणाऱ्या गुन्ह्याचे प्रकार घडून गुन्हे दाखल झाले होते. सदर गुन्हे उघडकीस आणून प्रतिबंध करण्याकामी मा. श्री. अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व मा. श्री. प्रीतम यादवकर अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत शेळके मोहोळ पोलीस ठाणे यांचे अधिपत्याखाली पथक तयार करून पोलीस ठाणे हद्दीतील सदर गुन्हे प्रतिबंधात्मक करण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना व आदेश दिले होते.
दि. ०९/०१/२०२६ रोजी दुपारी ०३.३० वा. ते ०४.३० वा. चे दरम्यान मोहोळ नर्सरी ता. मोहोळ जि. सोलापूर येथे फिर्यादी हे गोवंश वाहतूक करणारी गाडी पकडण्यात आले असता त्याचा राग मनात धरून आरोपी नामे दानिश लियाकत कुरेशी, अहमदअली लियाकत कुरेशी, शहाबाज अब्दुललीम कुरेशी, तोफिक अब्दुललीम कुरेशी, इरफान इकबाल कुरेशी, इस्ताक कोडाजी कुरेशी, अफजल अफजल कुरेशी यांनी फिर्यादीस व लतीफ कुरेशी, ईश्वरसिंग यांची गोवंशांची गाडी पकडली, गोवंश वाहतुकीची टिप का देतो म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून तुला दोन दिवसांत जिवंत सोडणार नाही असे म्हणून बंदुकीचे धाक दाखवून गेले वरील मजकुराचे हकिकतीवरून मोहोळ पोलीस ठाणे गु.र.नं. ०४८/२०२६ भा.न्या.सं. कलम ९६(१), ९९(२), ११०, ३५२, ३५३(२)(३), ३८९ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५, १३६(३) गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीवर यापूर्वी दाखल असणाऱ्या गुन्ह्यांची माहिती मिळून आली.
यातील वरील नमूद आरोपी व त्यांचे इतर साथीदार यांनी सर्व शरीरविवरांमध्ये प्राणी संरक्षण विषयक गुन्हे यातिल टोळीप्रमुख व टोळीतील सदस्यांनी बेकायदेशीररित्या अवैध मांसाची, शेवाळाची अधिक फायदा मिळविण्याकरिता गुन्हेगारी क्षेत्रात संघटित पद्धतीने दाखवून निषेध निर्माण केली आहे. तसेच टोळी प्रमुख व टोळीतील इतर सदस्यांनी मोहोळ परिसरात कायदेशीर कत्तल करण्याचा प्राणी संरक्षण विषयक सामाजिक संघटना व नागरिकांचा विश्वास काढण्याची धमकी देऊन महाराष्ट्र करत असल्यामुळे जनमानसात त्यांची दहशत निर्माण झाली असून सामान्य जनता भयभीत झाली आहे. टोळीप्रमुख व इतर सदस्य यांच्यावर कळवलेली प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली असून देखील त्यांनी वेळोवेळी अशा प्रकारचे गुन्हे करून त्यांचे गुन्हे करण्याचे प्रस्थापित सातत्य ठेवले आहे. त्यांना कायद्याची भीती राहिलेली नसून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली असून पोलीस ठाणे गु.र.नं. ०४८/२०२६ भा.न्या.सं. कलम ९६(१), ९९(२), ११०, ३५२, ३५३(२)(३) व भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ९९९(२)(अ),(३),(४) प्रमाणे कलमवाढ करण्यात आली आहे.
दाखल गुन्ह्याचे तपासकामि आज दि. १२/०१/२०२६ रोजी आरोपी नामे (१) दानिश लियाकत कुरेशी, वय-२५ वर्षे, (२) अहमदअली लियाकत कुरेशी, वय-२४ वर्षे, (३) शहाबाज अब्दुललीम कुरेशी, वय-२७ वर्षे, (४) तोफिक अब्दुललीम कुरेशी, वय-३२ वर्षे, (५) इरफान इकबाल कुरेशी, वय-२७ वर्षे, (६) इस्ताक कोडाजी कुरेशी, वय-२९ वर्षे, (७) अफजल अफजल कुरेशी, वय-२४ वर्षे सर्व रा. कुरेशी गल्ली, मोहोळ ता. मोहोळ जि. सोलापूर यांना अटक करण्यात आली असून अधिक तपास करत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, मा. श्री. प्रीतम यादवकर अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवकते सोलापूर विभाग, पोलीस निरीक्षक हेमंत शेळके मोहोळ पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस/अविनाश पाटील, पोलीस/ईशांत शेळके, पोलीस/दयानंद हाडबे, पोलीस/सतीश रुपनर, पोलीस/अनिल जगताप, पोलीस/रमेश कुबेर, पोलीस/संदीप सावंत, पोलीस/सुनील पवार यांनी बजावली आहे.







