सालाबाद प्रमाणे संत हराळ्या समाज मंदिर राऊ ळ गल्ली बार्शी. संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत असते. बार्शीचे लोकनेते राजा भाऊ राऊत यांनी चर्मकार समाजासाठी समाज मंदिराची व खुल्या जागेमध्ये भव्य गुरु रविदास भवन देण्याचे ठरविले आहे. त्या संदर्भात जागा पाहण्यासाठी रिकाम्या जागेमध्ये झाडी झुडपे व मातीचे डिग असल्यामुळे पाहण्यास अडचणी येत होती आम्ही सहज बार्शीचे दिपक (आबा) राऊत नगरसेवक यांना फोन केला त्यांनी तातडीने जेसीबी नगरपालिकेचे कर्मचारी व सुपरवायझर अतिश रोकडे यांच्या देखरेखीखाली सर्व जागा स्वच्छ करून घेतली खरंच असा समाजकार्य करणारा नगरसेवक सर्व विभागामधून मिळावा अशी आशा सर्व समाज बांधवांनी केली. समाज बांधवांनी नगरसेवक दिपक (आबा )राऊत यांचे आभार व्यक्त केले.







